सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे व भाजपा एकवठले असून चारही पक्षांनी वज्रमूठ करून संघर्ष परिवर्तन पॅनल स्थापन केला असून १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहेत.अशी माहिती भोर येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत चार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना, भाजपा, ठाकरे गट आदी पक्षांचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी बाजार समिती व खरेदी विक्री संघ वापरण्यात आला असून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी तालुक्यातील सहकार मोडीत काढला आहे.तर बाजार समिती अडीच कोटी रुपये तोट्यात आहे. त्यामुळे तालुक्यातील सहकार पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी संघर्ष परिवर्तन पॅनलचे प्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे यांची नियुक्ती केली आहे.