सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगांव निंबाळकर : सुनिल जाधव
वडगाव निंबाळकर पुणे जिल्हा बँकेच्या कार्यालयामध्ये पीक कर्ज वाटप करताना जिल्हा बँकेचे कर्मचारी वर्ग अतिशय चांगल्या प्रकारे खातेदारांना सहकार्य करताना. नारबाबा विकास सोसायटी, संत सावता माळी विकास सोसायटी, वडगाव निंबाळकर विकास सोसायटी, भैरवनाथ विकास सोसायटी . अशा अनेक विकास सोसायटीचे पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे.पुणे जिल्हा बँक कार्यालयामध्ये येत्या आठ दिवसांमध्ये मुढाळे, वडगाव निंबाळकर, जायपत्रेवाडी, पळशी, कानाडवाडी, इतर गावातील सोसाट्यांचे खरीप पिक कर्ज वाटप केले जाणार असल्याचे गटविकास अधिकारी रणजीत जगताप यांनी सांगितले. यावेळी बँकेमध्ये अनेक शेतकरी वर्ग जमा झाला होता.
बँक शाखेचे प्रमुख डीपी कदम यांनी खातेदार यांना तीव्र उन्हाची ताप वाढल्यामुळे कोणीही बाहेर न थांबता बँकेत बसावे असे आवाहन केले व पाणी पिण्याची व्यवस्था केली. यावेळी बँकेचे कर्मचारी बँकेचे कॅशियर वि. पि.जाधव, एस. आर. गायकवाड,गणेश मदने, हरीष विधाते यांनी खातेदारांची गैरसोय होणार नाही असे सांगितले.त्यामुळे शेतकरी वर्ग अतिशय आनंदात आहे.