पुरंदर ! नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवारांची यादी जाहीर : भाजप-शिवसेना वेट अँड वॉचच्या भुमिकेत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज सकाळी दहा तर कॉग्रेसने दुपारी आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात शिवसेना ठाकरे गटाल एकही जागा दिली नाही. भाजप शिवसेना मात्र नाराजांच्या विश्वासावर साडेचार वाजेपर्यंत वेट अँड वाचच्या भुमिकेत आहेत. 
          नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक २०२३-२०२८ मध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत सोमेश्वर सहकार विकास पॅनेल मधून पुरंदर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदरचे व्यापारी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजकुमार जयकुमार शहा. ग्रामपंचायत मतदार संघ एस. सी. एस. टी. साठी अधिकृत उमेदवार सुशांत राजेंद्र कांबळे. ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार गणेश दत्तात्रय होले.
सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार शरद नारायण जगताप वामन अश्रू कामठे असे पाच उमेदवार तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी जाहीर केले 
         बारामती तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस बारामती 
ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार बाळू सोमा शिंदे. सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे भ. वी. जा. साठी अधिकृत उमेदवार भाऊसो विठ्ठल गुलदगड. सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे महिला प्रतिनिधीसाठी अधिकृत उमेदवार शरयू देवेंद्र वाबळे.
सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे सर्वसाधरणसाठी अधिकृत उमेदवार बाळासाहेब गुलाब जगदाळे. पंकज रामचंद्र निलाखे या पाच उमेदवारांची यादी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली. 

      पुरंदर तालुक्यातून कॉंग्रेस पक्षा तर्फे सोसायटी मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार संदिप सुधाकर फडतरे, अशोक आबासाहेब निगडे, देविदास संभाजी कामठे, महिला राखीव शाहजान रफिक शेख, इतर मागास प्रवर्गातून महादेव लक्ष्मण टिळेकर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मतदार संघ मनिषा देविदास नाझिलकर, व्यापारी मतदार संघ अनिल बबन माने, हमाल तोलारी मतदार संघातून विक्रम पांडुरंग दगडे असे आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.  
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला एकही जागा न दिल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. बारामती लोकसभा मिशन अंतर्गत भाजप, शिवसेना युती कडून नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सक्षम उमेदवार देण्याच्या भुमिकेत असून निवडणूक जिंकण्याचा उद्देश असल्याचा भाजपचे सचिन लंबाते यांनी सांगितले होते. भाजप शिवसेना साडेचार वाजेपर्यंत वेट अँड वाचच्या भुमिकेत असून महाविकास आघाडीतील  नाराज उमेदवारांवर त्यांचे लक्ष आहे.
To Top