सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
विरोधाला विरोध म्हणून थोपटे आणि थोपटे नावाच्या व काँग्रेस पक्षाच्या विरोधात एकवटून विरोधक प्रत्येक इलेक्शनला एकत्र येण्याचा चुकीचा प्रकार सध्या मतदार संघात तालुक्यामध्ये सुरू आहे.मात्र लोकशाही म्हटलं की लोकशाही पद्धतीने जनता त्याला उत्तर देत असते आणि सद्या झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना धूळ चारीत चोख उत्तर दिलेले आहे. विरोधकांनी कितीही एकत्र येऊन विरोध केला तरी भोर तालुक्यात थोपटे काँग्रेस पॅटर्न चालणार असे मत आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.
तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील वरवडी बुद्रुक भोर येथे संचालक राजाराम तुपे यांनी आयोजित केलेल्या भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित सभापती,उपसभापती तसेच सर्व संचालकांच्या जाहीर सत्कार समारंभात शुक्रवार दि.१९ आमदार संग्राम थोपटे बोलत होते.यावेळी माजी सभापती लहूनाना शेलार बोलताना म्हणाले भोर तालुक्याच्या विकासाला गती देणारे आमदार संग्राम थोपटे यांचे हात बळकट करण्यासाठी गावोगावचे कार्यकर्ते व नेत्यांनी एकत्र येऊन वज्रमूठ करून सामोरे जाऊ.तालुक्यातील व्हिके,एसके,बीजे तसेच आरएसएस असे कोणीही विरोधक आले तरी त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.यावेळी राजगड ज्ञानपीठ मानद सचिवा स्वरूपा थोपटे,माजी जि.प.सदस्य गीतांजली आंबवले,माजी सभापती बाळासाहेब थोपटे, लहूनाना शेलार,युवा नेते पृथ्वीराज थोपटे,माजी पं.स.सदस्य सतीश चव्हाण,राजगड संचालक उत्तम थोपटे,जनसेवक अनिल सावले,सभापती आनंदा आंबवले,उपसभापती ज्ञानेश्वर पांगारे,संचालक राजाराम तुपे,ख.वी.संघ चेअरमन अतुल किंद्रे,माजी सभापती अंकुश खंडाळे,संपत दरेकर, राजू शेटे, दिलीप वरे,मधुकर कानडे,प्रकाश म्हस्के, बापू बांदल, गोरख मानकर ,राजू शिंदे, विकास शिंदे, आनंद म्हस्के, पै.शिवाजी खोपडे,विकास शिंदे ,विजय तुपे,रवीनाना तुपे, शंकर तुपे ,अनंता तुपे ,लक्ष्मण तुपे,सुनील गायवाड,विजय भेलके आदींसह हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
थोपटे पुढे म्हणाले सध्या बाजार समिती व खरेदी विक्री संघावर तरुण,अभ्यासू लोकांचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनांचा फायदा करून देण्याचे प्रयत्न केले जातील.
COMMENTS