भोर ! आंबेघर पुलाचे कठडे मोजतायेत शेवटची घटका...बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर - महाड मार्गावरील महत्वाचा वाहतुकीचा आंबेघर ता.भोर पुलाचे कठड्यांची दुरवस्था झाले असून कठडे पूर्णता मोडकळीस आले आसल्याने येथील पुलाचे कठडे शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असून एखादा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
     भोर-महाड मार्ग कोकण किनारपट्टीला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते.सद्या भोर वरून महाडकडे वरंधा घाटमार्गे प्रवासाचा रस्ता सुस्थितीत असला तरी आंबेघर पूलाची कठडे तुटल्याने दुरवस्था झाली आहे तसेच वरंधा घाटात ठिकठिकाणी अनेक वळणांवर निरा-देवघर धरणाच्या बाजूने रस्ता तुटलेल्या अवस्थेत असल्याने प्रवासी वाहनचालकांना जीव मोठे धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.आंबेघर पूल येथे अपघात घडल्यास वाहन पुलावरून खाली नदीत कोसळले जाते.परिणामी प्रवाशांना नदीतील पाण्यात बुडून जीव गमवावा लागतो.प्रशासनाने लवकरात लवकर पुलाच्या कठड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी या मार्गावरील प्रवासी वाहनचालकांकडून होत आहे.
प्रवासी वाहन चालकांकडून संताप व्यक्त
     मागील चार ते पाच वर्षात आंबेघर पुलावरून नदीत कोसळून पाण्यात बुडून चार ते पाच जणांना आपला जीव गमावा लागला असल्याचे ताजे उदाहरण असतानाही प्रशासन पुलाच्या कठड्यांची दुरुस्ती करण्याकडे डोळेझाक करीत असल्याने प्रवासी वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.

To Top