सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर - प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील खानापूर ता.भोर येथील शेतकरी बाजीराव आनंदा नांगरे यांनी शेतात ७० पिशव्या काढणी करून ठेवलेला कांदा मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात भिजून नासल्याने अक्षरशः कांदा ढिगावर बकरी चरण्यास सोडली.यात शेतकऱ्याचे ३० ते ४० हजार रुपये नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागोपाठ तीन ते चार दिवस ढगाळ हवामान तयार होत होते.अचानक दोन दिवस अचानक झालेल्या अवकाळी पाऊसात वीसगाव खोरे परिसरातील नेरे, आंबाडे, बालवडी, पळसोशी, पाले,नीलकंठ, गोकवडी, भाबवडी हातनोशी, धावडी,बाजारवाडी येथील अनेक शेतकऱ्यांचे कांदा पिक भिजले गेले यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांची कांदा काढणी झालेली आहे.शेतकऱ्यांना कांदाचाळी उपलब्ध नसल्याने घरातच कांदा पसरवून ठेवला गेला आहे. मात्र घरात कांदा ठेवल्याने काही प्रमाणात नासधुस होऊ लागल्याने तर बाजार भाव कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.