सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परीसरातील तब्बल ३९ मुलांनी पोलिस भरतीत यश मिळविले असून या मुलांची वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये निवड झाली आहे. एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात मुले भरती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या यशामध्ये विवेकानंद अभ्यासिकेने राबविलेल्या सराव पेपर टेस्ट सिरीज ही फायद्याची ठरत आहे. त्यामुळेच विवेकानंद अभ्यासिकेच्या ३५ तर चंद्रमूर्ती अभ्यासिका मुर्टीची ४ मुलांची निवड झाली आहे. या मध्ये ९ मुली व २४ मुले व २ माजी सैनिक यांचा समावेश आहे. विवेकानंद अभ्यासिकेने या वर्षी राबवलेल्या "सोमेश्वर पॅटर्नची चर्चा यानिमित्ताने होत आहे." सर्व मुलांनी मिळवलेले हे यश सातत्य पूर्ण अभ्यास चिकाटी मेहनत ग्राउंडवरील सराव याचे आहे. भविष्यात हा निकाल तयारी करणाऱ्या मुलानंसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
भरती झालेली मुले पुढीलप्रमाणे : रामदास कारंडे (माजी सैनिक ) - मुंबई लोहमार्ग, भूषण भोई -मुंबई लोहमार्ग, आरोही शिळीमकर - ठाणे शहर लग्नानंतर पोलीस दलात भरती, मीनाक्षी करचे - पुणे लोहमार्ग लग्नानंतर पोलीस दलात भरती, अमृता चौधरी - सातारा, चेतन कोळपे - नवी मुंबई, दिपाली राणे - लग्नानंतर पोलीस दलात भरती, वैष्णवी होळकर , सायली करचे , संदीप जगताप - पिंपरी चिंचवड, मयूर गाडेकर - मीरा-भाईंदर, विशाल चव्हाण, विशाल जाधव, अनिकेत सोनवलकर, वैभव मासाळ -रायगड, प्रणय खेंगरे, किरण गाडे,
विजय पोटे, किरण घाडगे, सारिका काळे-पुणे शहर शिवाजी टकले, लखन माने, अमोल चिरमे, सोनाली होळकर पुणे ग्रामीण, तेजस खेंगरे, अजय शेलार, अक्षय भगत, कुमार बामणे, कुणाल बामणे, प्रणव साळवे, अभय भिसे, प्रणय शिंदे, सचिन मोरे, संदेश देढे, सुरज कुतवळ, ऋषिकेश गवळी- मुंबई शहर, धनाजी मोटे, प्रफुल्ल गोरे, विशाल गडदरे, आप्पा मोरे.