बारामती ! वृद्धाश्रामात धाडण्यापेक्षा आईवडिलाची सेवा करा : डॉ सूहास महाराज फडतरे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
काटेवाडी : प्रतिनिधी
आई-वडील देव-देवता आहेत त्यांना वृद्धा आश्रमात धाडण्यापेक्षा त्याची सेवा करा.आई वडिलाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असा उपदेश हभप डॉ सुहास महाराज फडतरे  यांनी केला.
ते ढेकळवाडी (ता बारामती ) दिवंगत आप्पासो व कौसल्या घुले यांच्या स्मृती दिना निमित्त आयोजित किर्तन निरूपन क्रार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले
किर्तनकार दमात्रय घुले नी आई वडिलाच्या स्मृती दिना निमित्त किर्तन निरूपम कार्यक्रमाचे आयोजन करून ' शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी ... या ओवी सार्थ ठरवत वडिलाचा सांप्रदायिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे        " आपुलिया हिता जोअसे जागता, धन्य माता पिता तयाचिया...'' या अंभगाच्या ओळी द्वारे त्यांनी निरूपम केले माणसाने नेहमी अवलोकन केले पाहिजे, अवलोकन करताना सिंहावलोकन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे निर्णय चुकत नाही प्रत्येकाने संत वाडःमया चा सखोल अभ्यास करावा. हे वाडःमय अगाध ज्ञान देणारे ज्ञानकोष आहे .
हे सहजासहजी येत नाहीत त्यासाठी संघर्ष आहे नेटका संसार करून परमार्थ करावा, संसारात जीवन व्यतीत करीतअसताना आई घराचा कळस, तर बाप हा घराचा पाया आहे हे जोपर्यत भक्कम आहे तोपर्यत आपले जीवन डळमळीत होणार नाही असे सागितले . घरातील आई वडिलांना मुलांप्रमाणे सांभाळा. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, म्हणून तर तुम्ही या ठिकाणी आहात, मदतीपेक्षा आधार द्या, हसत समाधानाने जगा, तरुण वर्गाने कष्टाने कमवा, पर्यावरणाचा समतोल राखा, मन खंबीर ठेवा, आजार होणार नाही. असा संदेश फडतरे महाराज यांनी दिला
 हभप दतात्रय महाराज घुले यांनी घुले कुंटूबियाच्या वतीने डॉ सुहास महाराज फडतरे यांचा स्मृती चिन्ह देवुन  सत्कार केला . घूले परिवाराच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला यावेळी ढेकळवाडी, तावशी,  भवानीनगर, डोर्लेवाडी, सणसर, बारामती परिसरातील भजनी मंडळ व ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते
To Top