सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील नाव्ही आळी येथील नामांकित सोसायटीमध्ये सासरच्या दीर, जाऊ ,सासू व नवऱ्याच्या जाचाला कंटाळून एका मध्यमवयीन तरुणीने राहत्या घरातील पंख्याला शनिवार दि.२७ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.याची फिर्याद प्रभाकर दिनकर खोपडे रा.भाटघर ता.खंडाळा यांनी भोर पोलिसात दिली.पद्मजा चंद्रकांत घोरपडे वय-२८ असे आत्महत्याग्रस्त तरुणीचे नाव आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पद्मजा हिला सासरचे सासू कलावती मधुकर घोरपडे,दीर संदीप मधुकर घोरपडे ,जाऊ रेश्मा संदीप घोरपडे व पती चंद्रकांत मधुकर घोरपडे रा.नवी आळी सर्व संगनमताने प्रापंचिक कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करीत होते.पद्मजा हिला जगणे असह्य करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पद्मजा हिने नाव्ही आळी श्रीपाद सोसायटी येथील राहत्या घरी गळफास घेतला.चार जणांवर पोलिसात गुन्हा दाखल केला गेला असून गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे व पोलीस हवालदार वर्षा भोसले करीत आहेत.