सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील पुणे -पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या पुलावर भरधाव ट्रक पुलावरील पादचारी मार्गात आला. माञ पुलाच्या संरक्षक कठड्यामुळे नदीत कोसळताना वाचला.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला.
दरम्यान अकरा वर्षापुर्वी पालखी सोहळ्यात नीरा नदीच्या पुलावरून वारक-यांचा ट्रक नीरा नदीत पलटला .त्या घटनेची आठवणीला उजाळा मिळाला. पुणे- पंढरपुर पालखी मार्गावरील वाहनचालकांचा व वारक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या पुलावर ट्रकला अपघात झाला. रविवारी (दि.२८) दुपारी साडेबाराच्या सुमारास लोणंद (जिल्हा सातारा) बाजूकडून मालवाहतूक करणारा ट्रक (क्र. एम.एच.१२.एच.डी. ०१९१) नीरा बाजूकडे चालला होता. अचानक महिला दुचाकीस्वाराने कट मारल्याने ट्रकचालकाने स्टेअरींग डाव्या बाजुला ओढले या दरम्यान ट्रकचे पुढील बाजूचे डावेचाक रस्त्याचे कमी उंचीचे कठड्यावरुन फुटपाथवर गेले. ट्रकची डावी बाजू पुलाच्या मोठ्या कठड्याला टेकणार तोच ड्रायव्हरने ब्रेक मारल्याने मोठा
अनर्थ टळला. अन्यथा ट्रक नदीत कोसळला असता.
नीरा, पाडेगाव, निंबूत, वाघळवाडी, मळशी येथील युवकांनी ट्रकचालकाला आधार देत, शर्तीचे प्रयत्न करत कठड्यावरुन ट्रक पुन्हा रसत्यावर आणला. यादरम्यान सुमारे दिडतास वाहतूक कोंडी झाली होती. पालखी मार्गावर नीरा बस स्थानका पर्यंत तर पाडेगाव ऊस संशोधन केंद्रा पर्यंत व नगर मार्गावर बुवासाहेब चौका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक युवकांनीच या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना वाट काढून देण्याचे प्रयत्न केले.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह प्रशासनाचे नीरा नदीच्या पुलाकडे दुर्लक्ष झाल्याने अपघात होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
-----------------------------------------------------------
अकरा वर्षापुर्वीच्या घटनेचा प्रशासनाला विसर ...
सुमारे अकरा वर्षापुर्वी आळंदीवरून पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्यातील ट्रकचालकाला नीरा नदीवरील नविन पुलाच्या कठड्याचा राञीच्या अंधारामुळे अंदाज न आल्याने पहाटे दोनच्या सुमारास ट्रक वारक-यांसह नीरा नदीत पलटी झाला होता. यामध्ये पाच वारक-यांचा मृत्यू झाला होता .
या घटनेचा प्रशासनातील बदललेल्या
अधिका-यांना विसर पडल्यामुळे नीरा नदीच्या पुलाजवळ नीरा बाजूला व पाडेगांव बाजूला अपघात प्रवण क्षेञ असतानाही येथे गतिरोधक, दिशा फलक, रिप्लेक्टर बसविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. माञ या ठिकाणच्या अपघात प्रवण क्षेञाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह, पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रशासन याकडे गांभिर्याने बघत नसल्याची चर्चा, नीरा , पाडेगांव परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
--------------------------------------------------------------