सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देश ऑनलाइन झाला. सोयीसाठी आलेले है तंत्र तरुणाई व मुलांच्या दृष्टीने कधी जुगारांचा अड्डा बनून गेला, हे कळलेच नाही. आज मात्र ऑनलाइन जुगारामुळे एक पिढी बरबादीच्या उंबरठ्यावर उभी आहे. हे संकट निर्धारपूर्वक तातडीने दूर करण्याची गरज आहे. अन्यथा घर जाळून कोळशाचा व्यापार करण्याची वेळ तरुणाईसह पालकांवर आल्याशिवाय राहणार नाही.
सध्याचा युवक युवती याचबरोबर सामान्य माणूस सुद्धा ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजीच्या आहारी जाताना मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी होताना दिसून येत आहे तर सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेमिंग ह्यांना पसंती दिली जातीय. ऑनलाईन गेमिंगमुळे शारीरिक विकासाबरोबरच मानसिक आणि बौद्धिक विकास होण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. ऑनलाईन गेमिंग कंपन्या पहिल्या वेळेस बोनस देऊन ह्याकडे आकर्षित करतात. जंगली रम्मी, रमी,झुप्पो, लूडो,ह्या सारख्या अनेक गेमिंगच्या माध्यमांतून कित्तेक कुटुंबांना आर्थिक जोखीमीस सामोर जावं लागलं आहे.मोबाईलच्या आतीव वापरामुळे अनेक युवकांच्या डोळ्यावर परिमाण होताना मोठ्या प्रमाणात दिसून येतोय.
------------------
महाराष्ट्रात निर्णय कधी?
महाराष्ट्रात मात्र आद्याप रमी सारख्या खेळावरती बंदी घालण्यात कोणताही निर्णय झालेला नाही. आगामी काळामध्ये युवकांच्या पर्यायाने संपूर्ण कुटुंबाला सायणाच्या या खेळावरती कायमस्वरूपी बंदी घालण्यात याव अशी मागणी सर्वच स्थरातून करण्यात येत आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाया ऑनलाइन गेम वर स्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. परंतु महाराष्ट्रात निर्णय कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रामध्ये अशाप्रकारच्या गेम ॲप वर बंदी घालण्यात यावी अशी पालकांची मागणी आहे.
COMMENTS