काय सांगताय...! शिक्षकाने साहेबांना रविवारी फोन केल्याची दिवसभर चर्चा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : विशेष प्रतिनिधी
एखाद्या अधिकाऱ्याला आपल्या अनधिस्त कर्मचाऱ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी फोनच करू नये का ? अशा आशियाची पोस्ट एका शिक्षकांनी थेट आपले अधिकारी यांना विचारल्यामुळे सदर अधिकाऱ्याला देखील काय उत्तर द्यावे हे समजेना.
तसेच या संभाषणातून अधिकाऱ्याला रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्या कर्मचाऱ्यांनी फोन केल्याचा रागही शिक्षकांवर निघाल्याच्या नंतर सदर शिक्षकाने थेट गटशिक्षणाधिकारी यांनाच साहेब मी रविवारी तुम्हाला फोन केला म्हणून राग आला का ?
रविवारी शिक्षकांनी तुम्हाला फोनच करायचा नसतो का ?
फोन केल्याच्या नंतर तुमचा सूर बदलला, तुम्हाला राग आला अशा आषयाची पोस्टच सदर शिक्षकाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना विचारून त्या पोस्टमध्येच पुढे सदर घटना बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या कानावर घालू का ?
अशा प्रकारचा मजकूर पुन्हा गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवल्यावर साहेबांनी शिक्षक संघटनांच्या प्रमुखांना सदर पोस्ट पाठवून याबाबत शिक्षकाला समजावून सांगा. अशाप्रकारे सदर शिक्षकाला बारामतीतील प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे फोन सुरू झाले.
त्यामुळे सर्वत्र या पोस्टची चर्चा सुरू होती.
याबाबत गटशिक्षणाधिकारी गावडे यांची प्रतिक्रिया घेऊन त्यांचे देखील म्हणणे जाणून घेतले तर वेगळा विषय तुमच्या साहित्यिक शब्दसंपत्तीतून झाला तर निश्चितच बातमीचा विषय होऊ शकतो.
To Top