सोमेश्वर रिपोर्टर टीम -------
सुपे : वार्ताहर
सुपे ( ता. बारामती ) येथील हजरत ख्वाजा शाहमन्सुर दर्गा ट्रस्टचे मुख्य विश्वस्त पदच वादाच्या भोवऱ्यात आले आहे. औरंगाबाद वक्फ मंडळ म्हणतेय येथे सद्या कार्यरत असणारे हे मुख्य विश्वस्त नाव चुकुन टाईप झाले आहे. त्यामुळे येथील दर्गा ट्रस्टला मुख्य विश्वस्त ( चिफ ट्रस्टी ) सद्या कोणीच नसल्याचे यातुन सिद्ध होत आहे.
दरम्यान येथील सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन काळे म्हणाले की मी स्वत: औरंगाबाद राज्य वक्फ मंडळाशी बोललो असुन दोन दिवसात मुख्य विश्वस्त कोण याची माहिती वक्फ मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे येथील दर्गा ट्रस्टला मागिल चार वर्षापासुन मुख्य विश्वस्तच कोणी नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सद्या मुख्य विश्वस्त म्हणुन कारभार हाकत असलेले युनुस कोतवाल यांचे पदच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोतवाल यांनी या पदावर नसताना मागिल चार वर्षापासुन दर्गा ट्र्स्टचा कारभार कसा काय हाकला याचीच चर्चा सुपेकरांमध्ये आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे येथील गट क्रमांक ७७२ मधील जनाई कॅनालसाठी संपादित केलेल्या जमीनीचा मोबदला मिळणेबाबतचा विषय आला होता. त्यानुसार वक्फ मंडळाने भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंके यांना संदर्भाचे पत्र १८ मे ला देण्यात आले आहे.
या पत्राच्या अनुषंगाने स्थळ पहाणी व सविस्तर चौकशी करुन स्वयंस्पष्ट अहवाल मुळ अभिलेखासह कार्यालयास सादर करण्याबाबत आपणास सुचित करण्यात आले होते. त्या प्रतमध्ये अर्जदाराच्या नावापुढे मुख्य विश्वस्त ( चिफ ट्रस्टी ) असे नजर चुकिने टाईप करण्यात आले असल्याचे वक्फ मंडळाचे म्हणने आहे.
अर्जदार युनुस कोतवाल यांना हजरत ख्वाजा शाहमन्सुर दर्गा ट्रस्टचा मुख्य विश्वस्त असल्याबाबतचे राज्य वक्फ मंडळाचे कोणतेही आदेश नाहीत. तसेच वक्फ मंडळात बदलेला पहिला अहवाल क्रमांक ४२/३५७/२०१८ आणि दुसरा अहवाल क्रमांक ४२/२६९/२०२० नुसार दाखल असुन त्यामध्ये त्यांचे नाव सामिल आहे. तसेच सदरचे दोन्ही आहवाल सुनावणीत प्रलंबित असुन त्यावर कोणतेही निर्णय अद्याप घेण्यात आले नाहीत अशी माहिती राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे. तसेच एक पत्र माहितीसाठी युनुस कोतवाल यांना देण्यात आले आहे.
दरम्यान यासंदर्भातील वाद हा सुपे पोलिसांकडे गेला आहे. यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्गा ट्रस्टच्या नव्या व जुन्या अशा सर्वच विश्वस्तांना बोलावुन नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यावेळी दोघांची बाजु समजावुन घेतली. तसेच औरंगाबाद राज्य वक्फ मंडळाशी बोलुन लवकरच वाद मिटवण्यात येईल असे काळे यांनी सांगितले.
त्यानंतर नुकताच काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की वक्फ मंडळाशी संपर्क झाला असुन दोन दिवसात मुख्य विश्वस्त कोण आहे याबाबत लेखी पत्र वक्फ मंडळ देणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
दरम्यान युनुस कोतवाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मीच या पदावर कार्यरत असुन आमची बदनामी करण्याचा प्रयत्न काहींकडुन होत आहे.
...................................
COMMENTS