भोर ! तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम पट्ट्याला गारांचा पाऊसाने झोडपले

Admin
 
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात दोन दिवसांपासून उकाड्यात वाढ होत असताना ढगाळ वातावरण तयार झाले होते.सोमवार दि.२९ सायंकाळी अचानक तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम पट्ट्यात अवकाळी गारांचा पाऊसाने जोरदार हजेरी लावलेले शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली तर जनावरांच्या चाऱ्याचे भिजून नुकसान झाले.
          तालुक्याच्या दक्षिण व पश्चिमेकडील वीसगाव, चाळीसगाव खोऱ्यात सोमवार दुपारच्या दरम्यान जोरदार वारा,विजांचा कडकडाट याच्यासह गारांचा पाऊस अचानकच सुरू झाल्याने शेती कामात व्यस्त असलेले शेतकरी वर्ग चांगलेच गोंधळून गेले तर पाऊस सुरू होताच शेतकऱ्यांची धावपळ उडाली. तर विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाने पाऊस सुरू असताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
To Top