बारामती ! वडील करतात मासेमारीचा व्यवसाय... पण पोरीनं नाव काढलं..! वाणेवाडीच्या दिप्तीची राज्यस्तरीय ड्रॉप रो बॉल स्पर्धेसाठी निवड

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता बारामती येथील दिप्ती गजानन घाडगे हिने सांगली येथे पार पडलेल्या ड्रॉप रो बॉल् स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ड्रॉप रो बॉल् स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
        वाणेवाडी येथील ग्रामपंचायमध्ये पूर्वी कर्मचारी म्हणुन काम करणारे दत्तात्रय बंडू घाडगे यांची दिप्ती ही नात आहे.  दीप्ती गजानन घाडगे ही सद्या भादे याठिकणी राहत असून तिने सांगली येथे झालेल्या विभागीय ड्रॉप रो बाॅल  स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ड्रॉप रो बाॅल स्पर्धेसाठी निवड झाली. 
          दिप्तीच्या घरची परिस्थिती खूप हलाख्याची होती तरी सुद्धा त्यांच्या घरच्यांनी तिला या खेळासाठी प्रोत्साहन दिले. तिला शाळेत कमी पडू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी मासेमारीचा व्यवसाय करता करता सर्व प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यास  प्रवृत्त  केले या तिच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले .






वाणेवाडी गावची कन्यारत्न व ग्रामपंचायत वाणेवाडी माजी कामगार दत्तात्रय बंडू घाडगे यांची नात कुमारी दीप्ती गजानन घाडगे सध्या राहणार भादे हिची सांगली येथे झालेल्या विभागीय ड्रॉप रो बाॅल  स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ड्रॉप रो बाॅल स्पर्धेसाठी निवड झाली  दिप्ती ही परिस्थिती खूप हलाख्याची होती तरी सुद्धा त्यांच्या घरच्यांनी  तिला खूप सपोर्ट केला कधी तिला शाळेत कमी पडू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी मासेमारीचा व्यवसाय करता करता सर्व प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यास  प्रवृत्त  केले या तिच्या जिद्द आणि चिकाटीच्या  जोरावर तिने हे यश संपादन केले .
To Top