बारामती ! प्रदीप कदम ! लग्नसराईत छापील निमंत्रण पत्रिकेपेक्षा....निमंत्रण देण्यासाठी सोशल मीडियावर दिला जातोय जादा भर...देशाची वाटचाल 4G कडून 5G कडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
सोमेश्वरनगर : प्रदीप कदम
 देश 4G कडून 5G  कडे मोठ्या प्रमाणात वाटचाल करत असताना आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ते सामान्य माणसापर्यंत आणि मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक युव्वा वर्गाचं इंटरनेट आणि सोशल मीडिया बद्दल आवड निर्माण होण्याचा परिणाम मोठ्या वाढताना दिसून येतीय.
  यंद्याच्या कुठल्याही सांस्कृतिक,राजकीय,घरगुती कार्यक्रम समारंभाच्या  निमंत्रनाची पत्रिका छापील पध्दतीने देण्या पेक्षा ऑनलाईन पध्दतीने पाठवुन देताना मोठ्या प्रमाणात दिसून आले,ह्यालाच सोशल मीडियाचा चांगला वापर म्हणता येईल.
         लग्न समारंभ,वास्तुशांती याच बरोबर कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमांची  निमंत्रण पत्रिका ऑनलाईन पध्दतीने सोशल मीडियाद्व्यारे  पाठवुन दिल्यामुळे एकंदरीत लागणाऱ्या कागदाचा खर्च आणि कागद लागणाऱ्या वनस्पतीचा आर्थात निसर्गाचा ह्रास या दोन्ही गोष्टीबरोबरच मानसिक बळ आणि इंधनाची बचत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक नुकनास कमी झाल्याचे आढळून आले,यामुळेच सर्वसामान्य माणसाचं ऑनलाईन पध्दतीने सोशल मीडियाचा वापर करून निमंत्रण पत्रिका पाठून देण्याचे प्रमाण अधिक आधिक आढळून आले.
To Top