कौतुकास्पद ! वयाच्या ४० व्या वर्षी बारावीची परीक्षा देत पळशीच्या मा. सरपंचाने ८८ टक्के गुणांसह शाळेत पटकावला पहिला नंबर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
शिक्षणाला वय नसतं म्हणतात..हे खरं आहे बारामती तालुक्यातील पळशी गावचे माजी सरपंच बाबा चोरमले यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. २००० साली दहावीच्या परीक्षा दिल्यानंतर तब्बल २३ वर्षांनी बारावीची परीक्षा देत न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणीभापकर विद्यालयात ८७. ८३ टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला. 
         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीचा निकाल नुकताच निकाल जाहीर झाला. लोणीभापकर येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लोणीभापकर बारावी 2023 चा शाळेचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये 
  बाबा रामा चोरमले हे प्रथम क्रमांकाने पास झाले आहेत.  
        प्रथम क्रमांक आलेले चोरमले हे पळशी गावचे माजी सरपंच असून २००० साली ते न्यू इंग्लिश स्कूल, लोणी भापकर येथेच दहावीत देखील प्रथम क्रमांकाने पास झाले होते. त्यानंतर २०१२ ते २०१५ दरम्याने  डिप्लोमा सिव्हिल मध्ये सोमेश्वर पॉलिटेक्निकल कॉलेज सोमेश्वरनगर येथे प्रथम आले होते. तसेच सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते २०१५ ते २०१७  यावर्षी उच्च श्रेणीत परीक्षा पास झाले आहेत. त्यानंतर त्यांनी २०१७ ते २०२२ या काळात पळशी गावचे सरपंचपद भूषवले आहे. या काळात त्यांना पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार देखील मिळाला आहे.
To Top