सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी(ता. बारामती) येथे आयोजित केलेल्या सर्वरोग निदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबीरात १८७ जणांची तपासणी करण्यात आला.
शिबीराचे उदघाटन माजी आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पुष्पलता जगताप, राष्ट्रवादीचे खडकवासला अध्यक्ष व माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांच्या उपस्थित शिबीराचे उदघाटन झाले. यावेळी मुरुमचे सरपंच संजयकुमार शिंगटे व वाणेवाडीच्या सरपंच गीतांजली दिग्विजय जगताप, उपसरपंच धीरज चव्हाण उपस्थित होते. शिबीरात हृदयरोग तपासणी, शुगर व बी.पी तपासणी ,रक्तातील पेशी व चरबी तपासणी, किडनीची तपासणी, लिव्हरची क्षमता तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी , ईसीजी तपासणी करण्यात आली.डॉ मेहुल ओसवाल, डॉ.शुभांगी गाडे, डॉ. तेजश्री जगताप, डॉ. सुखदा जगताप, डॉ. गणेश जगताप, डॉ. विलास काटकर, डॉ. प्रदीप भोसले, डॉ.अमोल जगताप आदी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र होळ येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे शिबिरास सहकार्य लाभले. वाणेवाडीचे माजी सरपंच दिग्विजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन राहुल पवार व वाणेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सतीश जगताप यांनी केले होते.
COMMENTS