सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
प्रादेशिक विद्या प्राधिकरण,राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेने सादर केलेल्या इनसिनीरेटर या प्रकल्पास इयत्ता ९वी ते १२ वी या गटात प्रथम क्रमांक प्राप्त होऊन ह्या प्रकल्पाची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
सदर प्रकल्प तयारीमध्ये विद्यार्थिनी ग्रीष्म रसाळ हिने चांगली तयारी केली होती.ह्या प्रकल्पाचे प्रदर्शन ऑनलाईन व्हिडिओ माध्यमातून करण्यात आले होते. प्रकल्पामध्ये महिलांच्या मासिक पाळी दरम्यान वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्याचे घरगुती तसेच सार्वजनिक पातळीवर वापरण्यात येईल असे उपकरण बनवण्यात आले होते.या प्रकल्पास प्राचार्या रोहिणी सावंत तसेच आश्रमशाळेतील विज्ञान शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन झाले. विज्ञान प्रदर्शनातील यशासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री अजिंक्य हनुमंतराव सावंत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.