बारामती ! कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुनील पवार तर उपसभापतीपदी निलेश लडकत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी .सुनिल वसंतराव पवार यांची तर उपसभापती पदी.निलेश भगवान लडकत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
     बाबाब बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीच्या अगोदर विरोधी पक्षनेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष.संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदी.सुनिल वसंतराव पवार,रा.माळेगाव खुर्द यांची तर उपसभापती पदी.निलेश भगवान लडकत,रा.शेरेवाडी-बाबूर्डी यांची नावे जाहीर केली. 
          याप्रसंगी तालुकाध्यक्ष.संभाजी होळकर, निवडणूक निर्णय अधिकारी.मिलिंद टंकसाळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यध्यक्ष .धनवान वदक,दूध संघाचे चेअरमन .संदिप जगताप, बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन .दत्तात्रय आवळे,.लक्ष्मण मोरे,.नारायणराव कोळेकर,.तुषार कोकरे,श्री.सुनिल बनसोडे,.दिलीप परकाळे,.विलास कदम,.संभाजी किर्वे, .सूर्यकांत गादीया व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते
To Top