मेढा ! राजकारणा विरहीत सुख:दुःखात आम्ही बरोबर : वसंतराव मानकुमरेंकडून गिरी कुटुंबीयांचे सांत्वन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा - प्रतिनिधी
राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रु नसतो याचा प्रत्यय महिगाव येथिल माजी सभापती सुहासदादा गिरी यांच्या मातोश्री आणि माजी सभापती  जयश्रीताई गिरी यांच्या सासुबाई कै. हिराबाई गिरी यांच्या तिसऱ्याच्या निमित्ताने पहावयास मिळाला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी गिरी कुटुंबातील सदस्यांची सांत्वन भेट घेऊन राजकारणा विरहीत आम्हीही सुख दुःखात आम्ही बरोबर असल्याचा आदर्श दाखवुन दिला.
        सध्या जावलीतील जनतेला राजकीय नेत्यांचे वेगवेगळे रूप पहावयास मिळत असताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढ दिवस असो कि विकास कामांचा उद्घाटन सोहळा असो व्यासपिठावर वसंतराव मानकुमरे यांच्या कडून धडाकेबाज टोलेबाजी झाली नाही असे चित्र कधी कोणाच्या ऐकीवात नाही अस होणार नाही. नेहमीच टोलेबाजी करणारे वसंतराव मानकुमरे यांनी भाषणाला संधी मिळाल्यावर माजी सभापती सुहास गिरी यांना चिमटा काढल्याशिवाय राहीले नाही.
           माजी सभापती सुहास गिरी व माजी सभापती सौ जयश्रीताई गिरी यांच्यावर नेहमीच टिका करणारे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी गिरी कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळल्या नंतर राजकारणातील हेवेदावे बाजूला करीत महिगाव येथिल निवासस्थानी जावुन पतीपत्नीची विचारपूस करुन आम्ही तुमच्या सुख दुःखात सहभागी असल्याचा माणूसकीचा दाखला दिला. राजकारण हे ठराविक मर्यादे पर्यत असते परंतु माणूसकी पहिल्यांदा आणि नंतर राजकारण हे दाखवून दिले.
             यावेळी त्यांनी महु हातेघर धरणासह विकास कामांबाबत चर्चा केली. हिंदुराव तरडे, विजय देसाई, विजय आप्पा शेलार उपस्थित होते. आ. शशिकांत शिंदे, माजी अर्थ व शिक्षण सभापती अमितदादा कदम, बाजार समितीचे संचालक मच्छिंद्र मुळीक, मनिष फरांदे आदी राजकिय, सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी गिरी कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग नोंदवून सांत्वन केले.
To Top