भोर ! शिक्षक संघ पॅनलचा दणदणीत विजय : भोर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणूक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षक संघ पॅनलचा पुन्हा एकदा १५ पैकी १५ जागांवर विजय मिळवल्याने तालुका शिक्षक संघाने एकहाती सत्ता राखली.
     पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिक्षक संघाचा शिक्षक संघ पॅनल विरुद्ध शिक्षक समितीचा परिवर्तन पॅनल समोरासमोर रिंगणात उभे होते.यात ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या तर ११ जागांसाठी निवडणूक लागली होती.शुक्रवार दि.५ झालेल्या निवडणुकीत शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदाम ओंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संघ पॅनलने विरोधकांना धूळ चारीत सर्वच्या सर्व जागा जिंकून एकहाती सत्ता राखली.
शिक्षक संघ पॅनल विजयी उमेदवार
बापू जेधे ,संपत मळेकर, पंडित गोळे, राजेंद्र चव्हाण, संजू वाल्हेकर, राजेंद्र गुरव, सुवर्णा कापरे ,सविता तनपुरे ,लक्ष्मण दामगुडे ,अमोल निगडे ,दत्तात्रय पांगारे, अनिल बीरामने ,हनुमंत साप्ते ,अशोक चव्हाण ,रामदास साळवे.


To Top