भोर ! हीर्डोस मावळातील शिरगाव येथे अवैद्य दारू विक्रेत्यावर छापा : भोर पोलिसांची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हीर्डोस मावळ खोऱ्यातील शिरगाव ता.भोर येथे घराजवळील एका पत्रा शेडमध्ये मद्य विक्री करीत असल्याची माहिती भोर पोलिसांना मिळाली.भोर पोलिसांनी तत्परतेने सापळा रचून मद्य विक्री करणारावर छापा टाकून दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई केली.
      भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरगाव ता.भोर येथे घराशेजारील पत्रा शेडच्या आडोशाला दोन व्यक्ती देशी मद्य ओळखीच्या लोकांना बिगर परवाना विक्री करत असल्याची खबर मिळाली. तात्काळ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार उद्धव गायकवाड, विकास लगस तसेच निलेश सटाले यांनी अवैद्य धंद्यावर छापा मारला असता देशी मद्याचा साठा मिळून आला.आरोपींवर दारूविक्री आधीनियम कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.

                                       
To Top