Bhor news ! बाजारवाडीतील भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळणार : पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
 मागील काही महिन्यापासून बाजारवाडी ता.भोर गावांमध्ये भुरट्या चोरांकडून चोऱ्या होत असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत.भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांची माहिती संकलन करणे सुरू असून लवकरच त्यांच्या मुस्क्या आवळण्याचे काम केले जाईल तर अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे असे भोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.
       भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील किल्ले रोहिडेश्वर गडाच्या पायथ्याशी असलेल्या बाजारवाडी गावात भुरट्या चोरांकडून रात्रीच्या वेळी घरातील भांडी, अन्नधान्य, इलेक्ट्रिकल्स मोटारी, बंधारे वरील प्लेटा, व सार्वजनिक वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत.या घटनेची तक्रार तसेच गावात वीना परवाना छुप्या पद्धतीने मद्य विक्री केली जात असल्याची माहिती भोर पोलीस स्टेशनला येत असल्यामुळे शुक्रवार दि.१९ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, बीट अंमलदार यशवंत शिंदे यांनी बाजारवाडी ग्रामस्थ यांच्याशी बैठक घेऊन गावातील भुरट्या चोऱ्यांच्या व मद्यविक्री करण्याच्या प्रकाराबाबत माहिती घेत चर्चा केली.भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळल्या जातील तर मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.तर गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करून गावात गस्त घालावी असे आवाहन करण्यात आले.
To Top