इंदापूर ! छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र बलवंड यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
काटेवाडी : प्रतिनिधी
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र साहेबराव बलवंड (वय ६५ ) रा . ढेकळवाडी (खताळपट्टा) यांचे रविवार दि २१ रोजी रात्री दुःखद निधन झाले . 
               त्यांनी बारामती खरेदी विक्री संघाचे संचालक , श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे सदस्य पद भुषवले आहे  ते ढेकळवाडी च्या सोनेस्वर विविध कार्यकरी सोसायटीचे चेअरमन पदि कार्यरत होते  त्यांच्या प्रश्चात पत्नी, विवाहीत दोन मुले, सुना, पुतणे ,विवाहीत एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे सामाजिक कार्यकर्ते विक्रम बलवंड यांचे ते वडिल होत . ते ढेकळवाडी परिसरातील भाऊ या नावाने परिचित होते मा. श्री अजितदादा पवार यांना राजकीय जीवनात सुरुवात करताना भाषण कसे करावे याचा अचूक सल्ला देणारे.  अजितदादा यांचे जिवलग मित्र म्हणून त्याची ओळख आहे ढेकळवाडी गावचे जेष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय व्यक्तिमत्व मा श्री. रामभाऊ बलवंड यांचा आज वाढदिवस होता सकाळ पासून अनेकानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मात्र त्या दिवशी रात्रो भाऊना श्रद्धांजली अर्पण करावी लागली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली . खताळपट्टा येथे त्यांच्यावर अत्य संस्कार करण्यात आले यावेळी बारामती परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, ग्रामस्थ, मित्र परिवार उपस्थित होते
To Top