वाई ! तुला जमीन वहिवाटु देणार नाही असे म्हणत मारहाण : तिघांविरोधात वाई पोलिसात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 वाई : प्रतिनिधी
वेलंग ता वाई येथे जमिनीच्या वादातून एकास मारहाण प्रकरणी तिघांच्या विरोधात वाई पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 
           पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी की वाई तालुक्यातील मौजे वेलंग गावातील सरमुक नावाच्या शिवारात गट क्रमांक 132 येथे  शामराव कांबळे ( फिर्यादी ) यांना  दि.8 रोजी सकाळी 10 वाजता जमिनीसाठी केलेला खर्च राजेंद्र कांबळे ( पुतण्या )यास मागितला याचा राग मनात धरून मी तुला पैसे देणार नाही व तुला जमीन वहिवाटु देणार नाही कोण येईल त्याला देखील मारेन तुझा खून करीन असे बोलून फिर्यादी यास जवळ पडलेल्या लाकडाने जबर मारहाण केली तसेच सुहासिनी कांबळे हिने पायातील चप्पल काढून फिर्यादीच्या तोंडावर मारली व विमल कांबळे यांनी तू बापाच्या पोटचा नाहीस तू इथे येईचे नाहीस म्हणून शिवीगाळ केली म्हणून शामराव कांबळे यांनी त्या तिघांच्या विरोधात वाई पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे अद्याप अटक करण्यात आली न्हवती याचा अधिक तपास वाई पोलीस स्टेशन करीत आहे.
To Top