सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिध
ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब पालकांच्या मुला-मुलींना आदर्शवत कुस्तीपटू बनवण्याचे केंद्र जवाहर कुस्ती संकुल भोर असून मल्लांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण देवून नामांकित खेळाडू घडविण्याचे शर्तीने प्रयत्न सुरू असल्याने भविष्यात भोर तालुक्यातील मल्लांची देशभर नामांकित मल्ल म्हणून डंका होणार असल्याचे चित्र आहे.
भोर शहराच्या जवळच संजयनगर येथे निसर्गरम्य वातावरणात मागील काही वर्षांपासून हिवाळी कुस्ती अभ्यास व प्रशिक्षण जवाहर कुस्ती संकुल भोर यांच्या माध्यमातून घेतले जाते.शिबिरात धाडशी खेळ,कुस्ती अभ्यास,नवनवीन खेळ,सर्वांग मेहनत तसेच शैक्षणिक नवीन उपक्रमही राबवले जातात.सद्या शिबिरात १२० विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून मल्लांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण देण्यावर प्रशिक्षक सुनील शेटे, संदीप शेटे, राहुल शेटे,सागर शेटे,संतोष शेटे,विनायक शेलार,योगेश गुठाळकर,नवनाथ बळे ,तानाजी लवटे यांनी भर दिला आहे.
-------------
होतकरू खेळाडूंसाठी विशेष प्रयत्न----
शहरी भागात सुशिक्षित पालक असल्याने पाल्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते.मात्र ग्रामीण भागातील गोरगरीब पालकांच्या अनेक होतकरू मुला - मुलिंना योग्य वेळी योग्य दिशा मिळत नाही. होतकरू खेळाडूंसाठी जवाहर कुस्ती संकुल भोरच्या माध्यमातून विशेष प्रयत्न सुरू असल्याचे शिबिराचे प्रशिक्षक सुनील शेटे यांनी सांगितले.