सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती प्रतिनिधी
राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री .उद्धव ठाकरे यांनी फक्त तोंडी मुख्यमंत्री पदाचा व आमदारकीचा राजीनामा दिल्याचे ऐकिवात होते. हा राजीनामा राजभवन कार्यालयात राज्यपाल महोदयांकडे उपलब्ध आहे का,असल्यास त्याची साक्षांकित प्रत मिळावी याची मागणी माहिती अधिकार कार्यक्रते नितीन यादव माहितीअधिकारात केली होती.
यावर राज्यपालांचे सचिवालय राजभवन कार्यालयाने सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे व राज्यपाल हे ही यात पक्षकार असल्याने याबाबत कोणतीही माहिती देता येणार नसल्याचा अजब दावा केला आहे. यामुळे नेमका माजी मुख्यमंत्री.उद्धव ठाकरे यांचा राजीनामा न्यायप्रविष्ठ कारण पुढे करत राजभवन कार्यालयास जाणुनबूजुन उपलब्ध करायचा नाही की वास्तविक त्यांचेकडे असा कोणता राजीनामाच उपलब्धच नाही हा मोठा प्रश्न या निमित्ताने पडतो आहे.यापुर्वी जेव्हा मराठा आरक्षण व धनगर आरक्षणाबाबत मी माहिती अधिकारात माहिती मागविली होती त्यावेळेस राज्य सरकाराने न्यायप्रविष्ठ बाब असताना देखील दोन्ही प्रकरणात मला माहिती उपलब्ध केली होती त्यामुळे नेमके या प्रकरणात माहिती न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण पुढे करुन नेमकी कोणाच्या दबावामुळे नाकारली जात आहे हा चौकशीचा भाग आहे. असे नितीन यादव यांनी सांगितले.