सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
कृषी उत्पन्न बाजार समिती भोरच्या सभापतीपदी आनंदा बाबुराव आंबवले (कर्णावड) तर उपसभापतीपदी ईश्वर बबन पांगारे(वेळू) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बिनविरोध नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा आमदार संग्राम थोपटे यांच्याहस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले तर पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंढरीनाथ घुगे यांनी काम पाहिले.यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, राजगड कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपट सुके,मा.जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे, राजगडचे संचालक शिवनाना कोंडे, अशोक शेलार,अरविंद सोंडकर , खरेदी विक्री संघाचे संचालक संपत दरेकर, बाजार समिती संचालक अंकुश खंडाळे,राजाराम तुपे,भाऊ मळेकर,सुरेश राजीवडे,धनंजय वाडकर, प्रवीण शिंदे, अनिता गावडे.राजेंद्र शेटे,दिपक गायकवाड, विनोद खुटवड आदींसह आजी -माजी पदाधिकारी, कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.