बारामती ! मुरुम सोसायटीच्या अध्यक्षपदी विकास जगताप यांची तर उपाध्यक्षपदी रुपाली कुंजीर बिनविरोध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम (ता. बारामती) येथील मुरुम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विकास फत्तेसिंग जगताप यांची तर उपाध्यक्षपदी रुपाली सिध्देश्वर कुंजीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बारामती येथील सहाय्यक निंबधक(सहकारी संस्था) कार्यालयात सोमवारी(दि.२२) रोजी या निवडी पार पडल्या. बारामतीचे सहाय्यक निंबधक मिलिंद टांकसाळे यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. या अगोदरचे अध्यक्ष संदीप चव्हाण व उपाध्यक्ष नंदकुमार सोनवणे यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर या निवडी करण्यात आल्या. 

     ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी महिलांना सहकारात स्थान देण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रथमच महिला संचालकांना काम करण्याची संधी मिळाली. या अनुकरणाने रुपाली कुंजीर यांना संधी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे. संचालकमंडळाने आर्थिक नियोजन करत अडचणीतील सोसायटी सुस्थितीत आणली आहे. सोसायटीला उर्जाअवस्थेत आणण्यासाठी अथक प्रयत्न करु असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी निवडीनंतर दिले. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, माजी अध्यक्ष संदीप चव्हाण, सुनिल चव्हाण, राहुल जगताप, फत्तेसिंह चव्हाण, निलेश शिंदे, सचिव प्रमोद जाधव तसेच संचालकमंडळ उपस्थित होते. 
To Top