सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु! येथील सिद्धेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कृष्णा आबुराव भगत तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय जयसिंग खोमणे यांची बिनविरोध निवड पार पडली.
नुकतीच बारामती निबंध कार्यालयात ही निवड पार पडली. सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी
सोमेश्वर कारखान्याचे संचालक सुनील भगत, मावळते अध्यक्ष डॉ.नंदकुमार यादव, मारुतराव माळशिकारे, संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक विलास भगत, नानासाहेब माळशिकारे, चंद्रकांत भगत, रामभाऊ चव्हाण, सतीश गावडे, नंदकुमार सावंत, शहाजी भगत, राहुल नाझीरकर, सुरेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते.