जावली ! धनंजय गोरे ! वाढदिवस म्हणटले की आपण..हॉटेल मध्ये जातो.. फिरायला जातो...पण कुंभारगणीचे जवळ-भिलारे परिवाराने लग्नाच्या वाढदिवशी केला अनोखा उपक्रम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : प्रतिनिधी
समाजात आज चंगळवाद बोकाळला असून वाढदिवस, लग्नदिवस साजरा करीत असताना त्याला बिभस्तपणा येत आहे, हजारो रुपये खर्च केले जातात, मात्र पण अशा सर्व गोष्टींना फाटा देत जावळी तालुक्यातील कुंभारगणी गावचे  अस्मिता व प्रसाद भिलारे या जवळ- भिलारे परिवाराने आपल्या लग्नाचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासताना गोरगरीब कुटुंबाना मदतीचा हाथ देत साजरा केला,त्यांनी आशा पद्धतीने साजरा केलेल्या उपक्रमाचे जावळी तालुक्यातून कौतुक होत आहे,
            रायगाव ता.जावळी येथिल कातकरी समाजातील झालेल्या या कार्यक्रमात किसनवीर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड,जिल्हा व्यसनमुक्ती संघांचे अध्यक्ष विलासबाबा जवळ, जवळवाडीच्या माजी सरपंच वर्षाताई जवळ,जावळी तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रशांत गुजर,रायगाव सरपंच हसीना मुजावर, नामदेव क्षीरसागर,उद्योजक संजय जेधे अरुण जवळ यांची प्रमुख उपस्थिती होती,
      यावेळी बोलताना वर्षाताई जवळ म्हणाल्या ज्या समाजात आपण रहातो त्या समाज्यातील गरीब-गरजू लोकांचे दुःख खुप मोठे आहे.ते दुःख आपण पूर्णता संपवू शकत नाही.पण काहीतरी निमित्ताने त्यांचे दुःख हलके करण्याचे काम करता येते.आम्ही नेहमीच अशा उपक्रमांना प्राधान्य दिले आहे.
    यावेळी या कुटुंबाने नेहमीच आशा प्रकारच्या सामाजिक कार्यात आपले योगदान दिले असून त्यांनी गरीब गरजूंना धान्य व कपडे देवून सामाजिक बांधिलकी जोपासली असून असे उपक्रम समाजात व्हायला हवेत असे मत जावळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष  प्रशांत गुजर यांनी यावेळी व्यक्त केले.
  जवळवाडीच्या मा.सरपंच वर्षाताई जवळ व विलासबाबा जवळ यांची कन्या अस्मिता व कुंभारगणी येथिल उद्योजक अशोकशेठ भिलारे व सुवर्णा भिलारे यांचे सुपुत्र प्रसाद यांच्या विवाह दिनानिमित्त या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रायगाव येथिल १० कुटुंबांना धान्य व महिलांना साड्या तसेच मुलांना खाऊ वाटप यावेळी करण्यात आले,जावळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत गुजर,सचिव पत्रकार धनंजय गोरे,सुहास भोसले, नामदेव क्षीरसागर यांचे शुभहस्ते याचे वाटप करण्यात आले
To Top