बारामती ! २ हजार रुपयांच्या नोटा असतील तर बाजारात सोन्याचा बाजार भाव जास्त आहे : ही अफवा असल्याचे किरण आळंदीकर यांच्याकडून स्पष्टीकरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाहेर पडणार असल्याने सोने वाढीव दराने विकले जात आहे अशा स्वरूपाचे मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसत असून यामध्ये कोणतेही तथ्य नसून हि केवळ अफ़वा असल्याचे इंडिया बुलिअन ज्वेलर्स असोसिएशन चे राज्य समन्वयक आणि संचालक किरण आळंदीकर यांनी सांगितले.
           दोन हजार रुपयांच्या नोटा असल्या तरी चालू बाजारभावाप्रमाणे ग्राहकांना किंवा गुंतवणूकदारांना सोने चांदी खरेदी करता येऊ शकते असे स्पष्ट करीत असतानाच. पूर्वी प्रमाणेच ५० हजार पेक्षा जास्त खरेदी असेल तर के वाय सी देऊन रु. दोन लाखापर्यंत ग्राहक रोख स्वरूपात सोने खरेदी करू शकतात मात्र दोन लाखांपेक्षा जास्त खरेदी असल्यास चेक किंवा आर. टी. जी एस द्वारे पेमेंट करून दागिणे खरेदी करता येतील असे किरण आळंदीकर यांनी सांगितले.
महिलांना जुने दागिणे विकताना अडचण येणार अशा स्वरूपाच्या हि बातम्या येत असून या संभ्रमित वृत्ताचे देखील आळंदीकर यांनी खंडन करून सांगितले कि हॉलमार्क नसलेले जुने दागिणे विकताना किंवा त्याचे नवीन दागिन्यात रूपांतर करताना ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नसून हा नियम फक्त ज्या जिल्ह्यात हॉलमार्क कायद्याची सक्ती आहे तेथील ज्वेलर्स साठी असून २ ग्राम च्या पुढील दागिणे हॉलमार्क शिवाय फक्त सराफ व्यवसायिकांना विकता येणार नाहीत, अशी कायद्यात तरतूद आहे त्यामुळे महिलांनी किंवा ग्राहकांनी संभ्रमित होऊ नये असे हि त्यांनी सांगितले.
To Top