सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
अतिशय तीव्र सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीराची त्वचा व केस याच्यावर घातक परिणाम दिसू शकतात. सूर्यप्रकाशामुळे त्वचेवरील आवरण खराब होऊन त्या ठिकाणी चट्टे उठणे , खास सुटणे तसेच बुरशीजन्य आजार होणे याची संभावना जास्त असते .
त्वचेवरील आवरणाचे नुकसान होऊन त्यामध्ये एपिडरमिस आवरणाच्या त्वचेवरती सूर्यप्रकाशामध्ये असणारे यु वी रेस मुळे ऑक्सिडेशन होऊन मेलेनिन नावाचा द्रावण जास्त स्त्रावतो व त्वचेवरतीकाळे चट्टे दिसू लागतात किंवा त्वचा गर्द रंगाची दिसू लागते
लक्षणे
त्वचेवर चट्टे येणे
त्वचा शीतपित्तासारखी लक्षणे येणे
खाज सुटणे
घाम जास्त येणे
पांढरे अथवा कले खवले सदृश्य चट्टे येणे
त्वचा जास्त कोरडी पडणे
त्वचा लाल होणे
केस जास्त गळणे
केस निस्तेज होणे
कोंडा होणे
केसात खाज येणे
उपाययोजना
तीव्र उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे गरजेचे आहे त्यापासून वाचण्यासाठी आपण सनस्क्रीन लोशन चा वापर करू शकता.
त्वचा अद्र ठेवणे,
उन्हामध्ये त्वचेचे संरक्षण करणे आणि झाकणे इत्यादी उपायोजना ही आपण करू शकतो.
आपल्या शरीरातील पाणी संतुलित करण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे,
उन्हाळ्यात उपलब्ध असलेली फळे खाणे.
पाणीदार आहाराचा समावेश शरीरामध्ये करणे गरजेचे आहे.
टीप - त्वचा व केशविकरामध्ये मध्ये तीव्र लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे
डॉ जयश्री वि भिलारे MD(AM) PGDC CSVD
त्वचा केशविकर तज्ञ
साईसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल