सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
उन्हाळ्यामध्ये तीव्र उन्हामध्ये वाढलेल्या उष्मांकामुळे शरीरावर होणारा घात याला आपण उष्माघात म्हणू शकतो साधारणता ४० अंश सेल्सिअस तापमानाच्या वरती उन्हाचा पार गेला की उष्माघाताची लक्षणे दिसण्याची दाट शक्यता असते.
उष्माघाताची लक्षणे
साधारण पंधरा मिनिटापेक्षा जास्त काळ हा तीव्र उन्हामध्ये शरीराचा संपर्क आल्यानंतर उष्माघाताची लक्षणे जाणवू शकतात.
उन्हाच्या संपर्कात आल्यानंतर त्वरितच उष्माघाताची लक्षणे दिसतीलच असे नाही सहा तासानंतर त्याच्या २८ तासांपर्यंत उष्माघाताची लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांची योग्य दखल न घेतल्यास व उपायोजना न केल्यास शरीरामधील विविध प्रक्रियांमध्ये बदल घडवून शरीरावर मोठाआघात होण्याची शक्यता असते.
डोकेदुखी
उलटी ,मळमळ
तोंडाला कोरड पडणे
चक्कर येणे किंवा डोळ्यासमोर अंधारे येणे
डोके जड किवा पकडल्यासारखे वाटणे
पाय दुखणे
अतिशय थकवा वाटणे
सुस्ती येणे अथवा जास्त झोपू वाटणे
इत्यादी
तीव्र किंवा जीवघेणी लक्षणे
अचानक छातीमध्ये धडधड होणे
चक्कर येणे
अतिशय भरभरून घाम येणे
शरीराचे तापमान वाढणे
ब्लड प्रेशर (रक्तदाब )कमी होणे
उपाययोजना
भरपूर पाणी पिणे
लिंबू सरबत अथवा नारळ पाणी असे पाणीदार पदार्थांचे सेवन करणे
दुपारच्या वेळी उन्हामध्ये न जाणे
उन्हामध्ये डोके आणि शरीर शक्यतो झाकणे
टीप - मधुमेह, ब्लड प्रेशर, पक्षाघात , मुतखडा इत्यादी रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे .
पाणी भरपूर पिताना लघवी स्वच्छ आणि शुभ्र होणे आवश्यक आहे इतपण पाणी पिणे योग्य .
अधिक माहतीसाठी आपण डॉक्टराकडून सल्ला घेणे गरजेचे आहे.
डॉ विद्यानंद भिलारे MD medicine CDM-UK
साइसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल