सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सोमेश्वरनगर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपास सन 2022 - 23 या वर्षामधील ऑइल विक्री व हायेस्ट एडिटिंग सेल्स केल्याबद्दल बारामती सेल्स एरिया हायेस्ट ल्युब व्हॅल्यूम परफॉर्मन्स अवॉर्ड म्हणजेच 'सर्वंकष कामगिरीचा पुरस्कार' मिळाला आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन पुणे विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर चापा सत्यनारायण, सेल्स ऑफिसर गौरव अग्रवाल, इंजीनियरिंग विभागाचे देवानंद व असद यांच्या हस्ते डब्ल्यू जे मेरिट हॉटेल पुणे येथे पुणे व सातारा डीलर मिटिंग मध्ये कारखान्याचे संचालक हरिभाऊ भोंडवे, किसनराव तांबे, कामगार कल्याण अधिकारी डी. व्ही. माळशिकारे यांनी उपस्थित राहून सदर पुरस्कार स्वीकारला. हिंदुस्तान कंपनीच्या वतीने विभागनिहाय पेट्रोल, डिझेल व ऑइल सर्वाधिक विक्री सह उत्कृष्ट ग्राहक सेवा व सर्वंकष पुरस्कार सरस कामगिरीसाठी दरवर्षी देण्यात येतात. यावर्षी सोमेश्वर कारखान्याच्या पेट्रोल पंप बारामती विभागातून सदर पुरस्काराचा मानकरी ठरला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, शांताराम कापरे, अभिजीत काकडे, ऋषिकेश गायकवाड, शिवाजीराजे निंबाळकर, जितेंद्र निगडे बाळासाहेब कामठे, रंजीत मोरे, कारखाना सेक्रेटरी के.डी. निकम चीप अकाउंटंट योगीराज नांदकिले यांनी सदर पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.
COMMENTS