Wai Big Breaking ! अल्पवयीन मुलीचे लग्न लावून शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करणाऱ्या आठ जणांवर भुईंज पोलिसात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
 वाई तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीची तिचा इच्छा विरुध्द तिचा विवाह केला तसेच शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल भुईंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सविता भोसले वय ३५ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.३०/ ८/२०२२ ते नोव्हेंबर २०२२ नक्की वेळ माहित नाही १६ वर्ष १० महिने असलेल्या मुलीस आपण देवदर्शनास निघालो आहोत असे खोटे सांगून नागेवाडी येथून मौजे पाचवड येथील असले गावच्या हद्दीतील श्री अंबाबाई मंदिरात नेऊन त्या मुलीचे हिरेश शंकर शिंदे रा. सर्कलवाडी याच्याबरोबर जबरदस्तीने लग्न लावून दिले कमलाबाई जाहिरे, अंबिका जाहिरे, चन्नाप्पा जाहिरे, राजाराम जगदाळे, रेखा शाहू, सिद्धाप्पा शिंदे, यांनी मुलीस लग्नास नकार देत असल्याने दमदाटी केली व तिच्या मना विरुद्ध सर्कलवाडी ता.कोरेगाव येथील हिरेश शिंदे याच्याबरोबर लग्न लावून दिले तसेच हिरेश शिंदे त्याच्या घरी त्या मुलीस वास्तव्यास ठेवून तिच्या मना विरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. त्याकामी  नवऱ्याकडील लोकांना आरोपी यांनी सहकार्य केले तसेच फिर्यादीचे मुलीचे लग्न लावून देणाऱ्या अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्याचा मुलगा नाव माहित नाही या सर्व आरोपींच्या विरुद्ध बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, बालविवाह प्रतिबंध अधिनियम या कलमाच्या अंतर्गत भुईंज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा अधिक तपास सपोनी गर्जे करीत आहेत.
To Top