सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम ता बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या निमित्ताने रुपाली राजेंद्र सोनवणे व हर्षदा विकास कदम यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार सोहळा प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फोटोंचे पूजन, सरपंच संजयकुमार शिंगटे, डॉ. अमोल जगताप, प्रशिल जगताप, ग्रा.पं. सदस्य तथा संचालक, मुरुम विकास सोसायटी, सदस्या शिवानी सोनवणे, प्रज्ञा शिंदे, हसीना इनामदार, तसेच नुसरत जहाॅं इनामदार, राणीताई माहूरकर इ.व महिलांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमांमध्ये मान्यवर उपस्थितांनी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. शहाजहान बाणदार, ग्रामविकास अधिकारी यांनी उपस्थित महिलांना पाणीपुरवठा योजनेची संक्षिप्त माहिती दिली,व उपस्थितांचे आभार मानले.