फलटण ! शेतात सायफन पाईप टाकण्यावरून वाद झाला...मंग त्या दोघांनी सचिनचा गळा दाबून खून करत मृतदेह विहिरीत टाकला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद, : प्रतिनिधी
डोंबाळवाडी ता. फलटण येथून आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा खून झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून लोणंद पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
           याबाबत लोणंद पोलिस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवार दि २३ रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास सचिन धायगुडे वय ३५, रा. डोंबाळवाडी ता.फलटण हा गुरांच्या धारा काढण्यासाठी शेतातल्या गोठ्यात गेल्यानंतर रात्री आठ वाजल्यापासून बेपत्ता होता. त्याबाबतची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात नितिन धायगुडे यांनी लोणंद पोलिसात दाखल केली होती. 

या प्रकरणी मयत सचिन धायगुडे याचे नातेवाईक आणि लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सहकाऱ्यांसह कसून शोध घेतला असता आज दि. ३१ रोजी बेपत्ता सचिन धायगुडे याचा मृतदेह कॅनॉल जवळील सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरीत आढळून आला. या प्रकरणी लोणंद पोलीसांनी राहुल नामदेव धायगुडे आणि प्रदिप दत्तात्रय टेंगले या दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता शेतात सायफन पाईप टाकण्यावरून असलेल्या वादातून सचिन धायगुडे याचा गळा दाबून खून करून त्याचा मृतदेह बंद असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरीत टाकला असल्याची कबुली संशयितांनीे दिली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर करीत आहेत.
To Top