सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून यावर्षीपासून ग्रामपंचायत स्तरावर सर्वत्र ज्या महिलांनी सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.अशा दोन महिलांचा सन्मान ग्रामपंचायतींमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला भोरच्या नजीक असणाऱ्या बसरापूर या ठिकाणी बुधवार (दि ३१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करून त्याचेच औचित्य साधून यावर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार महिला स्वयं सहायता बचत गटातून व महिला सक्षमीकरणातून महिलांसाठी विशेष योगदान देणाऱ्या संगीता चंद्रकांत झांजले व आरोग्य सेवेतून विशेष सामाजिक कार्यात सहभाग घेणाऱ्या अनुराधा कुंभारकर यांचा सन्मान सरपंचांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यमान सरपंच निलम झांजले, ग्रामसेविका मेघा गावडे, पोलीस पाटील विठ्ठल झांजले ,ग्रामपंचायत सदस्य राजश्री साळुंके, शोभा कुंभारकर ,अंगणवाडी सेविका अनिता झांजले, सामाजिक कार्यकर्ते दिलीप झांजले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS