सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
बारामती तालुक्यातील निंबुत येथील युवकाने गगन भरारी घेत एमपीएससी परीक्षेत राज्यात १२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सहाय्यक नगर रचनाकारपदी निवड झाली आहे.
सन २०२२ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत. नींबूत गावचे चिरंजीव अमरजीत सतीश लकडे यांची सहाय्यक नगर रचनाकार अधिकारी पदी महाराष्ट्र राज्यातून बाराव्या क्रमांकाने निवड झाली आहे.
त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ST ans english medium school लोणंद व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण डी एम पी सिंहगड कॉलेज पुणे येथे झालेले आहे ग्रॅज्युएशन नंतर यूपीएससी सीडीएस परीक्षा क्लियर होऊन इंटरव्यू दिला. एमपीएससी राज्यसेवा mains च्या परीक्षा दिल्या व भूमि अभिलेख विभागात देखील त्यांची निवड झाली. अशा विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी अपयशना न खचता जिद्द व चिकाटीच्या जोरावर आज ग्रेड वन ऑफिसर ची पोस्ट मिळवली आहे.
या सगळ्या शिक्षणामध्ये त्यांना वडील सतीश मारुती लकडे आजोबा मारुती लकडे कार्यकारी अभियंता ओंकार शेंदुरे व घोलप यांचे मार्गदर्शन लाभले आहे.