पुरंदर ! नाझरे धरणाच्या पाण्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जेजुरी : प्रतिनिधी
येथे श्री खंडोबा देवाच्या दर्शनसाठी आलेल्या सिन्नर तालुक्यातील एका तरुणाचा जेजुरी जवळील नाझरे धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाला आहे. 
           दरम्यान धरणातून एनडीआरएफच्या पथकाने या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आहे. सागर रावसाहेब जायभावे (वय २३, रा. गोंदे ता. सिन्नर) असे या तरुणाचे नाव आहे. जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर जायभावे, त्याचा भाऊ आणि मित्र शुक्रवार दि. १९ रोजी जेजुरीला देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शनाला जाण्यापूर्वी घरातील देवांना कन्हा नदीच्या
पाण्याने अंघोळ घालण्याची प्रथा असल्याने हे सर्वजण कन्हा नदीवरील नाझरे धरणावर आले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सागर जायभावे पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला, व खोल पाण्यात बुडाला.
स्थानिक तरुण, पोलिसांनी पाण्यात उतरून या बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला मात्र त्यांना यश आले नाही, सायंकाळच्या वेळी पुण्याहून एनडीआरएफचे पथक बोलविण्यात आले, त्यांनीही शोध घेतला रात्र झाल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. शनिवार दि. २०- रोजी सकाळी या पथकाने पाण्यातून प्रेत शोधून काढले.
To Top