बारामती ! केंद्रीय प्रदूषण नियंत्रक पथक धडकले नीरा नदीत.. पन्नास किलोमीटर अंतरातील घेतले जाणार पाण्याचे नमुने

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील नीरा गावापासून ते सोनगाव पर्यंत या ५० किलोमीटर अंतरामधील नीरा नदीच्या पाण्याचे नमुने तपासले जाणार आहेत.
        जलशक्ती मंत्रालय दिल्लीच्या पथकाने आज पुरंदर बारामती व इंदापूर तालुक्यातून वाह नाऱ्या नीरा नदी प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रक पथक दाखल झाले आहे. नीरा नदी काठी असलेल्या कारखाने व नदी लगतच्या गावचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नीरा नदी मध्ये सोडले जाते त्याचे दुष्परिणाम जलचर व लगतच्या गावांना होत आहेत .
           या  पथकाबरोबर पुरंदर बारामती व इंदापूर चे तहसीलदार प्रांतअधिकारी यांच्या समवेत ग्रां, निंबुत सरपंच निर्मला काळे उपसरपंच अमर काकडे सो.का. मा संचालक महेश काकडे युवा नेते गौतम काकडे  उदय काकडे विजय काकडे नंदकुमार काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
            सकाळी ९ वाजता निंबुत नाजिक आनंद व लक्ष्मीनगर येथील भागात नदी प्रदूषणामुळे मृत पावलेल्या माशांची पाहणी करून स्थानीक लोकांशी संवाद साधला.
संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन कार्यवाही करण्याचे आदेश या पथकाने दिले आहेत. यामध्ये नीरा शिवतक्रार, निंबुत, मुरूम, होळ, सांगावी, नीरावगज, सोनगाव आदी गावातील जवळपास पन्नास किलोमीटर अंतररातील नीरा नदीच्या पाण्याचे नमुने तपासले जाणार आहेत.
To Top