सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे - सातारा महामार्गावरील कुसगाव ता.भोर येथील एका तरुणाचे अपहरण करून खून करीत वरंधा घाटात मृत तरुणाचा मृतदेह फेकून दिला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने लावून दोन आरोपींना जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुसगाव ता. भोर येथील तरुण अजय अंकुश मांजरे दि.८ पासून बेपत्ता असलेबाबत राजगड पोलीस स्टेशन येथे दि.१६ मिसिंग दाखल होती.या अनुषंगाने यातील व्यक्तीचा अपहरण केल्याची माहिती स्थानिक पुणे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेची पाच तपास पथके तयार करून मिसिंगचा तपास सुरू केला.परंतु मीसिंग व्यक्तीचा मोबाईल नंबरवरून व्हॉट्स ॲप चॅटींग चालू असल्याने पोलिसांचा संभ्रम निर्माण होता.मात्र पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मागदर्शक सूचनाप्रमने तपास करत असताना गुन्हयातील आरोपी दिपक धनाजी जगताप (वय -३१)रा.रांझे ता.भोर , सागर नानासाहेब लिमन (वय- २६) रा. पारवडी ता.भोर हे खेड शिवापुर परीसरात आले असल्याची बातमी मिळाल्याने आरोपीना पारखून घेण्यात आले व अटक करण्यात आली. राजगड पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने तपासात आरोपांनी अपहरण केलेल्या अजय अंकुश मांजरे याचा खून केला आणि मयत प्रेत वरंधा घाटातून दरीत फेकून दिली असल्याचे निष्पन्न झाले.वरंधा घाटातील दरीत फेकून दिलेले प्रेत काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स, महाबळेश्वर सीस्कॅप रेस्क्यू अँड रिलीफ,महाड,रायगड जिल्हा, खंडाळा तालुका आपत्ती व्यवस्थापन संघ,खंडाळा तालुका(शिरवळ रेस्क्यू टिम) यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आरोपीना भोर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली असून गुन्हयाचा तपास राजगड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश सिळीमकर, नेताजी गंधारे, महादेव शेलार, अंमलदार सचिन घाडगे, राजु मोमीग, चंद्रकांत जाधव, मंगेश खडके, मंगेश भगत, यांचे मदतीने केली असून पुढील तपास राजगड पोस्टेचे पो.नि.सचिन पाटील करत आहेत.