सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
दौंड तालुक्यातील पडवी येथील युवकाने गगन भरारी घेत यु.पी.एस.सी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेत देशात २१८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आय.ए.एस
( जिल्हाधिकारी) पदी निवड झाली.
सन २०२२ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत पडवी गावचे चिरंजीव सोहम सुनील मांढरे यांची देशातून २१८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी पदी निवड झाली .
त्यांचे प्राथमिक शिक्षण दौंड व उच्च माध्यमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथे झाले आहे. प्रथम २०२१ मध्ये यू.पी.एस.सी परीक्षा पास होऊन त्यांची I.R.S
( assistant commissioner custom ) पदी निवड झाली होती. त्याही पुढे जाऊन त्यांची २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या यू.पी.एस.सी परीक्षेत गगन भरारी घेत IAS पदी निवड झाली.
जिद्द व चिकाटी च्या जोरावर त्यांनी Class one officer ची पोस्ट मिळवली आहे. या सगळ्या शिक्षणामध्ये त्यांना वडील सुनील मांढरे , आई कल्पना मांढरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण दौंड तालुक्यातून व ग्रामस्थ नीरा ,व उद्योजक निरंजन ननवरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.