सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काही पोलिसांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिनी होत चाली आहे. आपण असं कोणतंच कृत्य आपल्याकडून घडू देऊ नका ज्याने आपल्या परिवाराची मान खाली जाईल असे सांगत वडगाव निंबाळकर पोलीस कदाचित चांगले असतील असे म्हणत बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी शंका उपस्थित केली.
सोमेश्वरनगर ता बारामती येथे पोलीस दलात भरती झालेल्या ४० मुलांचा सत्कार विवेकानंद अभ्यासिकेच्या वतीने घेण्यात आला त्या कार्यक्रमात भोईटे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी होळकर होते. यावेळी राजवर्धन शिंदे, आर एन शिंदे, विक्रम भोसले, नवनाथ भोसले, सुनील भोसले, दिग्विजय जगताप, डॉ. देविदास वायदंडे, हेमंत गायकवाड
रामकांत गायकवाड, केशव जाधव, नितीन जाधव, राजू बडदे, योगेश सोळस्कर, नितीन ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते. आनंद भोईटे पुढे म्हणाले, पोलीस सेवेमध्ये नव्याने रुजू होणाऱ्या तरुणांना पोलीस झाल्यानंतर नोकरीं करताना स्वतःमध्ये बदल करावा लागेल असं अगळ पगळ राहून नाही चालणार. तुमच्या येणारी लोक ही खूप अपेक्षेने येणार आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेणं तुमचं काम असेल. माणूस अडचणी मध्ये असल्यानंतर दोनच ठिकाणी जातो एक म्हणजे म्हणजे मंदिरात आणि दुसरं पोलीस स्टेशनमध्ये त्यामुळे तुम्हाला समाजातील अडचणीमध्ये असणाऱ्या लोकांची मदत करण्याची संधी मिळते. कधी आपल्या आई-वडिलांची मान खाली जाईल असं कधी वागू नका. नोकरी करत असताना तुमच्या फिटनेस कडे विशेष लक्ष द्या. पोलिसा समाजातील खूप महत्त्वाचा घटक आहे खूप आशेने तुमच्याकडे पहिले जाते. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात रामदास कारंडे मुंबई लोहमार्ग, भूषण भोई -मुंबई लोहमार्ग, आरोही शिळीमकर - ठाणे शहर, मीनाक्षी करचे - पुणे लोहमार्ग, अमृता चौधरी - सातारा, चेतन कोळपे - नवी मुंबई, दिपाली राणे - पिंपरी चिंचवड, वैष्णवी होळकर - पिंपरी चिंचवड, सायली करचे - पिंपरी चिंचवड, संदीप जगताप - पिंपरी चिंचवड, मयूर गाडेकर - मीरा-भाईंदर, विशाल चव्हाण- रायगड, विशाल जाधव - रायगड, अनिकेत सोनवलकर - रायगड, वैभव मासाळ - रायगड, प्रणय खेंगरे-पुणे शहर, किरण गार्डी-पुणे शहर, विजय पोटे-पुणे शहर, किरण घाडगे-पुणे शहर, सारिका काळे-पुणे शहर, शिवाजी टकले-पुणे ग्रामीण, लखन माने-पुणे ग्रामीण, अमोल चिरमे -पुणे ग्रामीण, सोनाली होळकर -पुणे ग्रामीण, तेजस खेंगरे, अजय शेलार, अक्षय भगत, कुमार बामणे, कुणाल बामणे, प्रणव साळवे, अभय भिसे, प्रणय शिंदे, सचिन मोरे, संदेश देढे, सुरज कुतवळ, ऋषिकेश गवळी, धनाजी मोटे- पुणे ग्रामीण, प्रफुल गोरे पुणे ग्रामीण, आप्पा मोरे मुबंई शहर पोलीस, विशाल गडदे मुंबई शहर पोलीस यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन भोसले तर प्रास्ताविक गणेश सावंत यांनी केले.