सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोंगवली ता.भोर येथे शहीद नवनाथ शंकर भांडे यांच्या पत्नी विजया नवनाथ भांडे यांना जयहिंद फाउंडेशनच्या वतीने सौभाग्याचे लेणे देवून वीर पत्नी सन्मान बहाल करण्यात आला.
भोंगवली येथील सीआरपीएफ जवान नवनाथ शंकर भांडे यांना रायपूर ( छतीससगड ) येथे दि.३ जून २०२२ रोजी वीरगती प्राप्त झाली होती.त्यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दि.२३ मे ला होते.याच दिवसाचे औचित्य साधून वीर पत्नी विजया नवनाथ भांडे यांचे सौभाग्य लेणे त्यांना सन्मान पूर्वक देण्याचे कार्य जयहिंद फौंडेशनच्या सभासदांनी केले. यावेळी सरपंच अरुण पवार, सदस्य मंदा कुंभार,प्रीती बैलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.जयहिंद फाउंडेशनच्या कार्याची माहिती तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बैलकर यांनी दिली.जिल्हा सचिव स्नेहलता जगताप यांनी शहीद जवान नवनाथ भांडे यांना विनम्र अभिवादन केले व वीर पत्नी विजया यांना त्यांची सौभाग्य लेणी सन्मान पूर्वक बहाल करू असा मानस व्यक्त केला.विधवा प्रथा मुक्ती कशी गरजेची आहे या बद्दल विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी आलेल्या समस्त महिला व पुरुषांच्या मान्यतेने वीर पत्नी विजया भांडे यांना हळद - कुंकू लावून हिरव्या बांगड्या भरल्या, जोडवी घातली, केसात गजरे घातले व गळ्यात मंगळसूत्र घातले. विजया तावरे यांनी त्यांना साडी देवून ओटी भरली. कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांना वीर पत्नीने हळद - कुंकू लावले.
याच पद्धतीने वीर माता पार्वती भांडे यांना हळद - कुंकूचा मान दिला.स्नेहलता जगताप यांनी साडी - चोळी देवून ओटी भरली.वीर पुत्र राज यास सन्मान पत्र, शाल - श्रीफळ देऊन, सचिन तावरे लिखित ' 'शहीदगाथा' पुस्तकाची प्रत देण्यात आली.
COMMENTS