सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील सुरेश यादव यांची शिवसेनेच्या(शिंदे गट) सहकार सेनेच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे. मुंबई- दादर येथे शिवसहकार सेनेचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते यादव यांना निवडीचे पत्र देण्यात आले. तसेच वाणेवाडी येथील संपत बनकर यांची बारामती सचिव म्हणून निवड करण्यात आली. यावेळी सहकार सेनेचे कार्याध्यक्ष ॲड. आनंद सकुंडे, उपाध्यक्ष आनंद यादव यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. सुरेश यादव यांनी वाघळवाडी ग्रामपंचायती सदस्य म्हणून काम पाहिले असून तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. सहकार सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदत करण्याचे आश्वासन यादव यांनी निवडीनंतर दिले.