आज बारावीचा निकाल...! 'या' संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता निकाल : १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज (दि. २५) दुपारी दोन वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंटआउटही घेता येईल.

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने दहावी-बारावीचा निकाल यापूर्वीच जाहीर केला असून राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. यंदा बारावी परीक्षेसाठी १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच, विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका ५ जून रोजी दुपारी तीन वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामार्फत दिल्या जाणार आहेत. दरम्यान, निकालानंतर गुणपडताळणीसाठी दि. २६ मे ते ५ जून, छायाप्रतीसाठी २६ मे १४ जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा आहे. बारावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी अथवा गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

निकालासाठी अधिकृत संकेतस्थळे
https://www.mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org http:hsc.mahresults.org.in
To Top