सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती येथील डॉ. शुभांगी ओंकार पोटे- केकाण यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन केले आहे. त्यांना देशात 530 वा रँक प्राप्त झाला आहे.
शुभांगी या मूळच्या करमाळ्यातील वंजारवाडी येथील असून त्या सध्या बारामतीत वास्तव्यास आहेत. त्यांचे पती ओंकार पोटे हेही स्पर्धा परिक्षेतूनच बँकेची परिक्षा उत्तीर्ण झाले व सध्या अहमदनगर येथील स्टेट बँकेत ते शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. शुभांगी यांचे वडील सुदर्शन केकान हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत.
शुभांगी यांनी लग्नानंतरही स्पर्धा परिक्षांचा अभ्यास अतिशय जिद्दीने सुरु ठेवला होता. घरातच त्यांनी कसून अभ्यास केला. विशेष म्हणजे सासर व माहेर दोन्ही कडून त्यांना सातत्याने प्रोत्साहन मिळाल्याने त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. शुभांगी या बीडीएस असून सध्या ते बारामतीतील श्रीरामनगर येथे वास्तव्यास आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दंतचिकित्सक म्हणून त्यांनी करमाळा येथेही काम केलेले आहे.
लग्नानंतर पती स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून बँक अधिकारी झाल्यानंतर शुभांगी यांनीही कसून सराव केला व त्यांनीही अखेर यश मिळविले. त्यांच्या यशामुळे केकाण व पोटे परिवाराने काल दिवाळी साजरी केली.क्लास न लावता यश मिळवीत शुभांगी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास करताना कोणताही क्लास न लावता यश संपादन केले हे वैशिष्टय आहे. घरची जबाबदारी सांभाळत त्यांनी अभ्यास केला व आपल्या गुणवत्तेच्या आधारावर थेट आयएएस होण्याचे स्वप्न साकारले.